

Nagpur Hospitals Waterlogged
esakal
नागपूर: नागपूर जिल्हा रुग्णालयाची देखणी इमारत उभी राहिली. कोट्यवधीचा खर्च केला, मात्र पहिल्याच पावसात या रुग्णालयातील व्हरांड्यात पावसाचे पाणी साचले. मेयो रुग्णालय परिसराला तर तलावाचे स्वरूप आले. मेडिकलच्या परिसरातही पाणी साचले. मुसळधार पावसाचा फटका शहरातील तीनही मोठ्या रुग्णालयांना बसला.