

Nagpur Waterlogging
esakal
नागपूर: शहरात मंगळवारी दुपारी झालेल्या अवघ्या काही तासांच्या मुसळधार पावसाने नागपूरला अक्षरशः जलमय केले. महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नाल्या आणि नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात अनेक नाल्या व नाले तुंबल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर ते पाणी साचले आणि अनेक भागांत रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा आणि दाव्यांचा फज्जा उडाला.