

Nagpur
esakal
नागपूर: गेल्या आठ-दहा दिवसांपासून बेपत्ता असलेला मॉन्सून अपेक्षेप्रमाणे पुन्हा विदर्भात सक्रीय झाला आहे. शुक्रवारी शहरात हलक्या आषाढसरींमुळे कमाल तापमानात सात अंशांची घसरण होऊन वातावरण आल्हाददायक बनले. ऊन व उकाड्याने घामाघूम झालेल्या नागपूरकररांना सुखद दिलासा मिळाला.