Mon, October 2, 2023

नागपूर : अपघातात 'मजुराचा' मृत्यू
Published on : 1 May 2022, 2:59 am
रामटेक : तालुक्यातील लाखापूर शिवारात ट्रॅक्टर ट्रॉलीखाली चिरडल्याने सुरेंद्र नंदू मरकाम (४१) याचा मुत्यू झाला. २९ एप्रिलला रात्री ९ वाजता लोधा येथील ईश्वर दसाराम फुलबेल (३७) व जितेंद्र दसाराम फुलबेल (२६) यांनी ट्रॅक्टर, ट्रॉलीसह रस्त्यावर ठेवले होते. दरम्यान बोलेरो वाहनचा चालक प्रशांत कोकोडे ( रा. झिंझेरिया,ता. रामटेक ) याने ट्रॅक्टरला धडक दिली.
यावेळी ट्रॅक्टरवरील मजूर सुरेंद्र मरकाम खाली पडला. त्याचवेळी ट्रालीचे डाव्या बाजूचे चाक त्याच्या मानेवरून गेल्याने चाकाखाली दबून त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच देवलापार पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी पंचनामा करून बोलेरोचा चालक प्रशांत कोकोडे व जितेंद्र फुलबेल यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.