Reading Culture Declines in Nagpur
esakal
नागपूर : ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानाचा प्रसार व्हावा या उद्देशाने शासनाने जिल्ह्यात सार्वजनिक वाचनालयांचे जाळे उभारले. मात्र गत १३ वर्षांत जिल्ह्यातील तब्बल ३१ ग्रंथालयांना टाळे लागले असून त्यापैकी १४ वाचनालये एकट्या नागपूर शहरातील आहेत. यावरून जिल्ह्यातील वाचन संस्कृतीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.