Nagpur Property Prices Surge Ahead of Mumbai
esakal
नागपूर, ता. २८ : उपराजधानीच्या रिअल इस्टेट बाजार सध्या नव्या विक्रमी उंचीवर पोहोचला आहे. घरांच्या किमती वाढण्यामध्ये नागपूरने संपूर्ण देशाला मागे टाकले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकत्याच जाहीर झालेल्या ताजा हाउसिंग प्राईस इंडेक्स अहवालानुसार आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या तिसऱ्या तिमाहीत देशातील मोठ्या शहरांमध्ये नागपूरचा निर्देशांक १३८.२४ इतका सर्वोच्च नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे, या वाढीच्या दरात नागपूरने आर्थिक राजधानी मुंबई आणि पुणे यांसारख्या विकसित शहरांनाही मागे टाकले आहे.