Nagpur News: नागपूरचे नाव ‘दीक्षाभूमी’ करण्याची मागणी

Nagpur Renaming Demand : संजय राऊत यांनी नागपूरचे नाव ‘दीक्षाभूमी’ करण्याची मागणी केली असून विजय वडेट्टीवार यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. बावनकुळेंनीही यावर प्रतिक्रिया दिली.
Political debate intensifies over the demand to rename Nagpur as Dikshabhoomi.

Political debate intensifies over the demand to rename Nagpur as Dikshabhoomi.

esakal

Updated on: 

नागपूर,: मुंबईतील दादर स्थानकाच्या नामांतरावरून सुरू झालेला राजकीय वाद आता नागपूरपर्यंत पोहोचला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नागपूरचे नाव बदलून ‘दीक्षाभूमी’ करण्याची मागणी केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनीही या भुमिकेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नागपूरच्या नामांतरणाचा मुद्दा नवाच मुद्दा समोर आला आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...