Reshimbag Stamepde: किचनकीट’ वाटपावेळी चेंगराचेंगरी; कामगार महिलेचा मृत्यू, दहा ते बारा जखमींवर उपचार सुरू

रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात भाजप व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने आयोजित ‘किचनकिट’ वाटप कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी प्रवेशद्वारावर झालेल्या चेंगराचेंगरीत एका ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
Nagpur
Nagpur Esakal

Nagpur Reshimbuag Stampede: रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात भाजप व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने आयोजित ‘किचनकिट’ वाटप कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी प्रवेशद्वारावर झालेल्या चेंगराचेंगरीत एका ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. किमान दहा ते बारा महिला जखमी झाल्या. ही घटना शनिवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, कार्यक्रमाला १० ते १२ हजार महिला कामगार आल्या होत्या.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे उद्‍घाटन शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मनुबाई राजपूत (वय ६३) असे मृत महिलेचे नाव असून ती हातमजुरीचे काम करीत होती. याशिवाय पुनम चांडगे (वय ४३, रा. रामेश्वरी), शोभा मराम(वय ४५, रा. बजरंगनगर), नंदा गोल्हर (वय ५८, मानेवाडा), गीता रहांगडाले (वय ६०, मानेवाडा) अशी जखमींची नावे आहेत. मात्र, त्यापैकी पुनम चांडगे गंभीर जखमी असून त्यांच्यावर ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, नंदा गोल्हर आणि गीता रहांगडाले या मेडिकलमधून फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, जखमींची संख्या जास्त असून त्यांची माहिती लपविण्यात येत असल्याचे समजते.

कामगार महिलांना लाभ देण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने महिलांना ८ मार्च ते ११ मार्चदरम्यान ‘किचनकिट’ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी (ता.८) पहाटे पाचपासून सभागृहात कामगार महिलांनी गर्दी केली होती. कामगार कल्याणकारी मंडळाचे सहायक आयुक्त राजदीप धुर्वे यांच्यासह मंडळाचे सर्वच अधिकारी यावेळी उपस्थित होते. सुरुवातीला सभागृहात तीन ते साडेतीन हजार महिलांना बोलावून घेण्यात आले. मात्र, बाहेर अंदाजे दहा हजार महिलांनी रांगा लावल्याचे चित्र होते.

मंडळाद्वारे सर्व्हर डाऊन झाल्याचे सांगून महिलांना परत पाठवण्यात येत होते. किचनकिट मिळत नसल्याने महिलांनी गोंधळ घालणे सुरू केले. काही महिलांनी चक्क गेट बंद केल्यावरही त्यावरून सभागृहात जाण्याचा प्रयत्न केला. शनिवारी सकाळी महिलांनी अशीच गर्दी केली. अंदाजे १२ हजार महिला कामगार सुरेश भट सभागृहाच्या बाहेरील परिसरात किचनकिट मिळेल या आशेने उपस्थित होत्या. याशिवाय सभागृहाच्या आतमध्येही टेबलवर किचनकिट वाटपासाठी रांगा लावल्या होत्या.

मात्र, ढिसाळ नियोजनामुळे महिलांना एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर पाठविण्यात येत असल्याने सभागृहात गोंधळ उडाला. याशिवाय सभागृहात पाणी आणि पंख्याची व्यवस्था नसल्याने गुदमरायला लागल्याने महिलांनी बाहेर येण्याचा प्रयत्न सुरू केला. तेव्हाच सभागृहाच्या मुख्यद्वाराजवळही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि चेंगराचेंगरीस सुरुवात झाली. त्यात मनुबाई राजपूत खाली पडल्या आणि बेशुद्ध झाल्या. याशिवाय दहा ते पंधरा जणांना गंभीर दुखापत झाली. त्यांना पोलिसांनी मेडिकलमध्ये नेले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ही घटना कळताच महिलांनी रोष व्यक्त केला आणि घोषणाबाजी केली.

Nagpur
Mamata Banerjee: ''राम आठवला, पण उशिरा''; पश्चिम बंगाल सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

केवळ इव्हेंट, ढिसाळ नियोजन

कार्यक्रमाचे नियोजन अतिशय ढिसाळ असल्याचे दिसून आले. शुक्रवारी केवळ इव्हेंट म्हणून भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मात्र, नेते निघून गेल्यावर ढिसाळ नियोजनाचा फटका बसला. परिसरात महिलांना पहाटे पाच वाजतापासून रांगेत उभे करण्यात आले. यावेळी त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्यासह कुठलीही सोय करण्यात आली नव्हती. सकाळपासून आपला क्रमांक येईल या आशेने सायंकाळी पाच वाजेपर्यंत महिला काहीही न खाता पिता रांगेत उभ्या दिसून आल्या. त्यामुळे शुक्रवारीही या ठिकाणी गोंधळ उडाला होता. त्यानंतरही कुठलीच खबरदारी पक्ष आणि विभागाकडून घेण्यात आली नाही, हे विशेष.

पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद

दरम्यान याप्रकरणी पोलिसांकडून कुणावरही गुन्हा दाखल केला नसून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती कोतवाली ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली.

मेळावा भाजपचा नसून सरकारचा ः बंटी कुकडे

नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात घेण्यात आलेला मेळावा हा भारतीय जनता पक्षाचा नसून इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला होता. पक्षाकडून त्यात सहभागी होण्याचे केवळ आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्याचा भाजपशी संबंध नसल्याची प्रतिक्रिया शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी सकाळशी बोलताना दिली. शिवाय याबाबत कामगार कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. (Latest Marathi News )

पोलिसांचेही दुर्लक्ष

सुरेश भट सभागृह परिसरात मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी कामगार एकत्र आल्याने रस्त्यावर वाहतूक खोळंबल्याचे दिसून आले. मात्र, याकडे पोलिसांनीही दुर्लक्ष केले. परिसरात चाळीस महिला पोलिस कर्मचारी होत्या. मात्र, दहा हजार महिलांना चाळीस महिला पोलिस कशा नियंत्रित करतील हा मोठा प्रश्‍न आहे.

Nagpur
Election Commission: 3 वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असताना राजीनामा; अरुण गोयल यांच्याबाबत जाणून घ्या 5 गोष्टी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com