सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
सरसंघचालक डॉ. मोहन भागवतsakal

Nagpur : टीका करताना देशाचा गौरव कलंकित करू नका ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

रेशिमबाग येथील मैदानावर आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्गाचा समारोप पार पडला.
Published on

नागपूर : जगात कोरोना काळात सर्वाच चांगले काम भारताने केले. जी-२० परिषदेचे यजमानपद भारताला मिळाले. नवीन संसदेचे उद्‍घाटन झाले. देशात अनेक गौरवाचे क्षण दिसून येत आहे. परंतु देशातील राजकीय पक्षांनी एकमेकांवर टीका करताना देशाच्या गौरवाला कलंक लागू नये, याबाबत दक्षता बाळगली पाहिजे, असे प्रतिपादन आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
Nagpur : उपचारासाठी आलेला कैदी अन् पोलिसांची रंगली ओली पार्टी

रेशिमबाग येथील मैदानावर आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्गाचा समारोप पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या समारंभात मुख्य अतिथी म्हणून कणेरी कोल्हापूर येथील श्री सिद्धगिरी संस्थान मठाचे स्वामी अदृश्य काडसिद्धेश्वर उपस्थित होते. ते म्हणाले, देशाला वास्तविकतेत ज्या जागृतीची गरज होती, ते करण्याचे प्रयत्न होत आहेत. देशात बरेच चांगले होत आहे. देशात एकूण सुखद भावना आहे. त्याचप्रमाणे दुखद बाबीही आहेत. भाषेवरून, पंथसंप्रदाय वाद, मिळणाऱ्या सवलतीबाबत वाद पराकोटीला गेले असून आपसामध्येच भांडण होत आहे.

सीमेवर शत्रुला ताकद दाखविण्याऐवजी आपसात लढत असून वादाला हवा देणाऱ्यांचेही त्यांनी कान टोचले. पुढे ते म्हणाले, ‘सर्वांना सोबत घेऊन जाणारी आपली संस्कृती असून त्याचा विसर पडत आहे. जातीभेद झाला. आपल्या पूर्वजांनी चूक केली. त्यात सुधारणा कराव्या लागतील. देश आपला आहे. पूर्वज बदलता येत नाही.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
Nagpur : नागपूर शहर काँग्रेसमधील अंतर्गत वाद संपता संपेना

टीका करताना देशाचा गौरव कलंकित करू नका

हिंदू नाव वैश्विक आहे हा धर्म बंधूभाव, करुणा, सुचितेवर आधारीत आहे. देशाची एकात्मता, अखंडता कायम ठेवण्यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे. मध्यल्या काळात जातपात, पंथ संप्रदायावरून मतभेद होते. काही बाहेरच्या नागरिकांनी आक्रमण केले. नंतर ते बाहेर गेले. त्यांना विसरून या देशात असलेल्यांना आपलेच समजणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com