मॉन्सूनची संथ चाल | Maharashtra Monsoon Updates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Monsoon Updates

मॉन्सूनची संथ चाल

नागपूर - ज्या क्षणाची बळीराजासह विदर्भातील सर्वसामान्य नागरिक आतुरतेने वाट पाहात होते, तो मॉन्सून गुरुवारी विदर्भात दाखल झाला. मात्र, अपेक्षेप्रमाणे धुवाधार पाऊस न पडल्याने नागपूरकरांची घोर निराशा झाली. मात्र हवामान विभागाने शुक्रवारनंतर विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविल्याने या आठवड्यात वरुणराजा बरसण्याची दाट शक्यता आहे. (Maharashtra Monsoon Updates)

दक्षिण-पश्चिम मॉन्सूनने यंदा अंदमान व त्यानंतर केरळमध्ये निर्धारित वेळेआधीच धडक दिल्याने विदर्भातही मॉन्सूनचे लवकर आगमन होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र मधल्या काळात अनुकूल वातावरण न मिळाल्याने मॉन्सूनची पुढील वाटचाल मंदावली. गेल्या चार-पाच वर्षांचा इतिहास लक्षात घेतल्यास यंदा दुसऱ्यांदा विदर्भात मॉन्सूनचे उशिरा आगमन झाले आहे.

विदर्भात मॉन्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा प्रादेशिक हवामान विभागातर्फे करण्यात आली. मात्र मॉन्सूनला जोर नसल्यामुळे अपेक्षेप्रमाणे बरसलाच नाही. शहरावर बराच वेळपर्यंत काळेकुट्ट ढग गोळा झाले होते. काटोल रोड परिसरासह काही भागांत जोरदार सरी कोसळल्या. अन्य भागांत कुठे रिमझिम, तर कुठे हलका शिडकावा झाला.

Web Title: Nagpur Residents Are Disappointed Due To Lack Of Rain

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top