

Vehicle Fitness Test
ESakal
रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि वाहन तपासणीत पारदर्शकता आणण्यासाठी परिवहन विभागाने तयारी सुरू केली आहे. प्रवासी आणि मालवाहू वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्रे देण्यासाठी आता प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (RTO) स्वयंचलित चाचणी केंद्रे (ATC) कार्यरत असतील. ज्यामुळे मानवी हस्तक्षेपाची जागा घेतली जाईल.