
नागपूर : नागपूर ग्रामीणच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, गुन्हेगारी नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहा उपविभागात २२ पोलिस ठाणे आणि एकूण २ हजार १८७ नवीन पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, अशी माहिती पोलिस अधिक्षकांनी (ग्रामीण) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. राज्य सरकारच्या गृह विभागाकडे या नवीन पदांच्या निर्मितीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, असेही त्यांनी नमूद केले.