
नागपूर : अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून महापालिकेच्या आशीनगर झोनमध्ये कार्यरत राजू उपाध्याय या स्वच्छता कर्मचाऱ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. मृताच्या कुटुंबीयांनी गुरुवारी मृतदेहासह आनीनगर झोन कार्यालयाला घेराव घालत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.