

Savner site inspection for ₹10,000 crore fertilizer project with MLA and officials
Sakal
सावनेर : येथे दहा हजार कोटींच्या भव्य खत प्रकल्पाची उभारणी करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मंगळवारी आमदार डॉ. आशिष देशमुख आणि गॅस ऑथरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, तसेच एमआयडीसीच्या अधिकारी मंडळाने जागेची पाहणी केली. खुर्सापार, जटामखोरा, जलालखेडा आणि सावळी मोहतकर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत प्रकल्प आराखड्याचा सखोल आढावा घेण्यात आला.