Nagpur Weather Update: शुक्रवारी नागपूरात पावसाची लहान हजेरी; यलो अलर्टसह पुढील दोन तीन दिवस पावसाची शक्यता कायम
Nagpur Rain: नागपूर शहरात शुक्रवारी ढगाळ वातावरण व हलका पाऊस; प्रादेशिक हवामान विभागाने शनिवारीही यलो अलर्ट जारी केला. सायंकाळी शहरात फक्त ५.२ मिमी पावसाची नोंद झाली.
नागपूर : पावसाने आपला नित्यनेम कायम ठेवत शुक्रवारीही शहरात हजेरी लावली. मात्र मेघगर्जना अधिक आणि पाऊस कमी बरसला. प्रादेशिक हवामान विभागाचा यलो अलर्ट असल्यामुळे शनिवारीही पावसाची शक्यता आहे.