Nagpur Development: मुख्यमंत्री फडणवीस यांचा पुढाकार; नागपुरात १७०० हेक्टरवर नवीन आर्थिक शहर तयार होणार, रोजगाराच्या मोठ्या संधी
Smart City Nagpur: नागपूरच्या मिहान व बुटीबोरीजवळ १७०० हेक्टरमध्ये बीकेसीसारखे 'नवीन नागपूर' उभारले जाणार आहे. यामुळे हजारो रोजगार संधी निर्माण होणार असून, नागपूर व्यापारी केंद्र म्हणून विकसित होईल.
नागपूर : मिहान प्रकल्प आणि बुटीबोरी औद्योगिक क्षेत्राजवळ नवीन नागपूर विकसित करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याकरिता १७०० हेक्टर जागा अधिग्रहित केली जाणार आहे.