Nagpur Aerospace: नागपूर राफेल उत्पादनाचे जागतिक केंद्र ठरणार!
Rafale Production: नागपूरमध्ये डसॉल्ट एव्हिएशनच्या प्रकल्पांत राफेल लढाऊ विमाने संपूर्णपणे तयार केली जाणार आहेत. या प्रकल्पामुळे हजारो उच्च-कौशल्य रोजगार निर्माण होतील आणि आंतरराष्ट्रीय निर्यात होईल.
नागपूर : नागपूर लवकरच भारताच्या लढाऊ विमान उत्पादनाचा केंद्रबिंदू ठरू शकेल. फ्रान्सची एव्हिएशन कंपनी डसॉल्ट एव्हिएशनने राफेल लढाऊ विमाने पूर्णपणे भारतात तयार करण्याचा प्रस्ताव दिला असून अंतिम असेंब्ली मिहान येथे होणार आहे.