

Nagpur Share Trading Fraud Fake SEBI Certificate Used to Cheat Retired Deputy General Manager of 14 Lakh
esakal
नागपूर: शेअर बाजारात दररोज ५ टक्के नफ्याचे आकर्षक आमिष देत, नागपुरातील एका निवृत्त उपमहाव्यवस्थापकाची तब्बल १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शहर सायबर पोलिसांनी दोन सायबर चोरट्यांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.