nagpur cold
sakal
नागपूर - उत्तर भारतात थंडीची लाट पसल्याने उपराजधानीत थंडीची तीव्रता वाढलेली आहे. डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यापासून शहरातील तापमान घसरत असून गेल्या चार ते पाच दिवसांत तब्बल तीन अंशांनी पारा खाली आला आहे. रविवारी शहरातील तापमान ८.५ अंश नोंदवले गेले आहे. यंदाच्या हंगामातील सर्वात थंड दिवस म्हणून या दिवसाची नोंद झाली आहे. कमाल तापमान २७.८ अंशावर आले आहे.