नागपूर - पबमधील पार्टीमध्ये तरुणीचा मोबाईल नंबर मागण्यावरून दोन गटात झालेल्या वादाचे रूपांतर खुनी संघर्षात झाले. एका गटाच्या चार ते पाच जणांनी दोघांवर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळविले..या हल्ल्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना वर्धा मार्गावरील डाबो पबजवळ गुरुवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास ही थरारक घटना थर्टी फर्स्टच्या आधीच घडल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.प्रणय नरेश नन्नावरे (वय-२८, रा. महाल) असे मृताचे नाव आहे. तर गौरव ब्रिजलाल कारडा (वय ३४, रा. चिखली, डिप्टी सिग्नल, कळमना रोड) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी हिमांशू खंडेलवाल (वय-३२, रा. गणेशपेठ) याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत मुख्य आरोपी मेहुल रहाटे व हनी उर्फ तुषार अनिल नानकानी (रा. कामठी) या दोघांना अटक केली आहे..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणय आणि गौरव हे दोघेही मित्र आहेत. प्रणय हा शेअर मार्केटचा व्यवसाय करीत होता. तर गौरव हा सीएकडे नोकरीला आहे. नाताळनिमित्त २५ डिसेंबरला डाबो पबमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. हिमांशू, प्रणय, गौरव व त्यांचे मित्र मोन्टी, गोपाल जोशी, आर्यन गिरी आणि नादिया उर्फ ॲरनसोबत पार्टीत सहभागी झाले होते..गुरुवारी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास सर्वजण विमानतळ चौकाजवळील डाबो पबमध्ये गेले. पार्टीत मोठ्या संख्येने तरुण-तरुणी सहभागी झाले होते. आरोपी मेहुल आणि हनी हे सुद्धा सौम्या, रिषी व तुषार यादव या मित्रांसोबत पार्टीत आले होते.प्रणय व त्याच्या मित्रांच्या शेजारीच टेबलवर ते बसले होते. पार्टीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. सर्वजण मद्यधुंद होऊन डीजेच्या तालावर नाचत होते. दरम्यान दारूच्या नशेत असलेल्या मेहुलने नादियाला तिचा मोबाईल नंबर मागितला. प्रणयने विरोध करीत तिच्यापासून दूर राहण्यास बजावले. यावरून त्याचा आरोपींशी वाद झाला. हिमांशू व इतरांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता मेहुल आणि तुषारने शिवीगाळ करीत बाहेर निघून पाहून घेण्याची धमकी दिली..पबमधून बाहेर पडताच हल्लावाद वाढत असल्याने प्रणय व इतर मित्र पबमधून पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास बाहेर पडले. घरी जाण्यासाठी वाहनाकडे जात असतानाच आरोपीही तेथे आले. त्यांनी प्रणव व इतरांना शिवीगाळ सुरू केली. या दरम्यान त्यांनी आपल्या इतर मित्रांनाही तेथे बोलावून घेतले..आरोपींनी प्रणयला घेरून मारहाण सुरू केली. सौम्याने प्रणयच्या पोटात आणि छातीत शस्त्राने भोसकले. गौरव प्रणयच्या मदतीला धावला असता मेहुलने सौम्याच्या हातातील शस्त्र घेऊन त्याच्या पोटावर वार केला. दोघांनाही रक्तबंबाळ करून सर्व आरोपी फरार झाले. हिमांशूने तत्काळ इतर मित्रांच्या मदतीने दोघांनाही छत्रपती चौकाजवळील खासगी रुग्णालयात दाखल केले.डॉक्टरांनी तपासून प्रणयला मृत घोषित केले. तर गौरव याच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुन्हा नोंदवून सर्व आरोपींना अटक केल्याची माहिती आहे. पोलिस निरीक्षक नितीन मगर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.