Nagpur Crime : मध्यरात्री वृद्धावर फावड्याने हल्ला; नंदनवन भागातील घटना, सीसीटीव्हीत दोन जण कैद
Nagpur News : नागपूरच्या नंदनवन भागात दुकानात झोपलेल्या ६० वर्षीय वृद्धावर दोन अज्ञात व्यक्तींनी फावड्याने वार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून मेडिकल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नागपूर : झोपलेल्या वृद्धावर फावड्याने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. जखमीवर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची स्थिती अत्यंत नाजूक आहे. अब्दुल रहिम (६०) रा. नंदनवन असे जखमीचे नाव आहे.