

Walls Built for Swachh Bharat Ironically Surrounded by Garbage
Sakal
नागपूर : स्वच्छ भारत अभियानाची भिंत उभारून त्या भिंतीच्या शेजारीच अनधिकृत डंपिंग यार्ड उभारण्याचे कर्तृत्व महानगर पालिकेने गाजविले आहे. सिद्धेश्वर सभागृहाच्या परिसरात मागील काही महिन्यांपासून कचऱ्याचा ढीग वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मानेवाडा सिमेंटरोडवर सिद्धेश्वर सभागृहाजवळ सतत अस्वच्छता असते.