Nagpur SIR: जिल्ह्यातील १०.८१ लाख मतदारांचा शोध लागेना!; एसआयआर ; मतदार यादीतून नावे होणार कमी ; प्रशासनाकडून एएसडी मतदारांची यादी जाहीर

SIR Verification Finds Missing, Migrated and Duplicate Voters: नागपूर जिल्ह्यात एसआयआर मोहिमेदरम्यान १०.८१ लाख मतदारांचे गणना प्रपत्र प्राप्त झाले नसल्याचे समोर आले आहे.
Nagpur SIR

Nagpur SIR

esakal

Updated on

नागपूर: भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत जिल्ह्यात तब्बल १० लाख ८१ हजार २१४ मतदार ‘गणना प्रपत्र जमा न होणे’ (एन्युमरेशन फॉर्म जमा न केलेले) या प्रवर्गात आढळले आहेत. एकूण ४६ लाख ३८ हजार ५८९ मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल २३.३१ टक्के आहे.

एसआयआरअंतर्गत जिल्ह्यातील ४ हजार ६१० बीएलओंनी घरभेटी दिल्यानंतर हे १०.८१ लाख मतदार गैरहजर, कायमस्वरूपी स्थलांतरित, मृत, अन्यत्र नोंदणी केलेले किंवा इतर कारणांमुळे न आढळल्याचे (एएसडी) प्रशासनाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील ४६ लाख ३८ हजार ५८९ मतदारांपैकी ३१ लाख ३० हजार २१३ मतदारांचे (६७.४८ टक्के) गणना प्रपत्र भरून स्वाक्षरीसह प्राप्त झाले आहेत. मात्र, तब्बल १० लाख ८१ हजार २१४ मतदारांकडून प्रपत्र प्राप्त झाले नाहीत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com