

Nagpur CCTV Cameras
sakal
नागपूर : शहरात गेल्या काही वर्षांमध्ये घरफोड्या, दुचाकी वाहनांच्या चोरीसह अन्य चोऱ्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. चोरीच्या तपासात सीसीटीव्हीचा वापर महत्त्वाचा ठरतो. मात्र, शहरातील बारा ते पंधरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने गुन्हेगारांचा मागोवा कसा काढणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.