Nagpur : स्वखर्चातून केली शहरात धूर फवारणी

शहरांत कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढले
nagpur
nagpursakal

सावनेर : आजाराने बेजार झालेल्या लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न येथील प्रयास ग्रुपने केला. डेंगू सारख्या आजाराने शहरात धुमाकूळ घातल्यानंतर शहरातील प्रत्येक गल्लीत धूर फवारणी करण्याचा संकल्प या ग्रुपने केला. त्यांच्या या कार्यामुळे शहरातील संसर्गजन्य आजार काही काळ आटोक्यात होते. युवकांनी केलेल्या कार्याचे अनेकांनी कौतुक केले आहे.

पावसाचे दिवस यातच डासांचा वाढता प्रादुर्भावामुळे शहरात किटकजन्य आजाराने चांगलेच डोके वर काढले होते. लहानांपासून थोरांपर्यंत तापाचे रुग्ण संख्येत वाढ झाल्याने नागरिक त्रस्त होते. उपचारासाठी खासगी आणि शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या रांगा लावण्याची वेळ होती. याशिवाय डेंगू आजारानेसुद्धा डोके वर काढले होते. जवळपास २० ते २२ डेंगूचे रुग्ण शहरात आढळून आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. आरोग्य विभाग व नगर परिषद कर्मचारी उपाय योजना व जनजागृतीला करण्यासाठी पुढे आले. यावर आवर घालण्यासाठी शहरातील नागरिकांनी धूर फवारणी करण्याची मागणी केली होती. शहरात सर्वत्र डासांचा प्रादुर्भाव वाढत असताना नगर परिषदेचे चार फॉगिंग यंत्र नादुरुस्त होते. त्यामुळे धूर फवारणीचा प्रश्न कायम होती.

दुचाकीवर मशीन बांधून केली फवारणी

शहरातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असताना शहरातील प्रयास या संस्थेच्या युवकांनी पुढाकार घेतला. शहरातील प्रत्येक भागात धूर फवारणी शक्य नसल्याचे युवकांच्या लक्षात आले. अशावेळी नगर परिषदेवर विसंबून न राहता त्यांनी वेगळाच निर्णय घेतला. नगर परिषदेचे दोन यंत्राने शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यांत नियमित धूर फवारणी करीत होते. मात्र या दोन यंत्रावर संपूर्ण शहरात फवारणी करणे शक्य नव्हते.

प्रयास टीमच्या युवकांनी रस्त्यावर उतरून जटामखोरा व कोठोडी या ग्रामपंचायतीकडून दोन फाँगिंग यंत्र मिळविले. त्यावर त्यांनी काही खर्च केला. तसेच दुचाकीवर ते यंत्र बसवून धूर फवारणी पंधरवडा मोहीम राबविली. युवकांच्या या कार्याचे नगर परिषदेच्या कर्मचारी व नागरिकांनी कौतुकही केले. याशिवाय याच ध्येयवेड्या युवकांनी स्वयं स्फूर्तीने श्रमदानातून इतरही समाजोपयोगी कार्य पार पाडले. यात प्रामुख्याने मनोज बसवार,नरेंद्र वाघेला,विकास गुप्ता, रमेश घटे,निखिल माडेकर,विनीत पाटील,अजय महाजन,रूपेश कमाले,प्रमोद नाईक,अखील झटाले, सोनू बाविसस्टाले, विजय तिडके,संदीप जैन,पवन चांडक, पीयूष घटे यांचा यात सहभाग होता.

nagpur
‘डेंगी’च्या निमित्ताने राजकीय धूर; विरोधक आक्रमक, सत्तारूढ रस्त्यावर

कर्तव्याची जाणीव असल्याने केले काम

बुद्धिमत्ता, विचारशक्ती,भावना या मनुष्याला मिळालेल्या देणगी आहे. समाजात उपयुक्त ठरतील, अशा सामाजिक कर्तव्याचे निर्वाह करण्याची जबाबदारी नैतिक दृष्टिकोनातून स्वीकारावी. ‘माझं गाव, माझी सामाजिक जबाबदारी’ या सामाजिक जाणिवेतून आमचा समविचारी युवकांचा प्रयास ग्रुप मागील सहा वर्षापासून स्वयंस्फूर्तीने आणि स्वयं खर्चाने कार्यरत आहे.

मनोज बसवार, संयोजक प्रयास ग्रुप, सावनेर

सामाजिक बांधीलकीतून श्रमदान

वैयक्तिक प्रगती व सामाजिक बांधीलकी जपत प्रयास टीमने श्रमदानातून स्मशान घाट स्वच्छता व रंगरंगोटी केली. कोविड काळात रस्त्यावर उतरून शक्य होईल ती गरजूंना मदत केली. याशिवाय शहरातील सामाजिक समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. गरजू विद्यार्थ्यांना मदत पोहोचविणे आधी कामे करण्यात आम्हाला आनंद होतो.

- विकास गुप्ता, सामाजिक कार्यकर्ता सावनेर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com