Snake Bite: वेळीच उपचार मिळाल्याने वाचले ७७ लोकांचे प्राण, ग्रामीण भागात सर्पदंशाचे प्रमाण जास्त

Snake Bite: वेळीच उपचार मिळाल्याने वाचले ७७ लोकांचे प्राण, ग्रामीण भागात सर्पदंशाचे प्रमाण जास्त

भारतात सर्पदंशामुळे अनेक लोकांचा मृत्यू होतो. मात्र, नागपुरातील सर्पदंश झालेल्या ८० लोकांपैकी ७७ लोकांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
Published on

Nagpur Health: राज्याच्या दुर्गम ग्रामीण भागात सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना घडतात. नागभूमी म्हणून कधीकाळी प्रसिद्ध असलेल्या नागपूर जिल्ह्यातही वर्षभरात ८० व्यक्तींना सापाने चावा घेतला आहे. मात्र वेळीच उपचारामुळे ८० पैकी ७७ सर्पदंश झालेल्यांना वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

वाढलेल्या मानवी वसाहतीमुळे वनांमधील प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले. त्यात सापाचा समावेश होतो. शेतात धुडगूस घालणारे उंदरांचा कर्दनकाळ असलेला हाच साप आता स्वतःचाच जीव वाचवण्यासाठी धडपडत आहे. ग्रामीण भागांत आजही साप दिसणे खूप सामान्य बाब आहे. अनावधानाने सर्पदंश झालेल्या अशाच ७७ जणांना वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचू शकले.

उपचारास विलंब धोक्याचा

२०२३ मध्ये सर्पदंश झालेल्या ८० जणांना वन्यजीव सोसायटीने रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी ७७ जणांना वेळेत उपचार मिळाले. यामुळे त्यांचे प्राण वाचू शकले. मात्र ३ जणांना सर्पदंशानंतर उपचारासाठी विलंबाने रुग्णालयात पोचले. यामुळे त्यांचा जीव वाचू शकला नाही. मृतांमध्ये ५ वर्षांच्या मुलांसह ६३ वर्षांच्या वृद्धाचा समावेश आहे. सर्पदंशाची बहुतांश प्रकरणे नागपूर ग्रामीणभागातील असल्याची माहिती मिळाली. सर्पदंशामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांपैकी बहुतांश जण मेयो व मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल झाले.

या सर्पमित्रांमुळे वाचला जीव

वाइल्ड लाइफ वेल्फेअर सोसायटीच्या पुढाकारातून सर्पदंश झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. सोसायटीचे नितीश भांदककर, गौरांग वायकर, राकेश भोयर, साहिल शरणागत, सौरभ अस्वार, प्रवीण टुले या यांनी सर्पदंशानंतर गांभीर्य बाळगल्याने डॉक्टरांकडून युद्धपातळीवर वैद्यकीय मदत मिळवून दिली. त्यामुळे नागरिकांचे प्राण वाचवणे शक्य झाले. वेळेवर योग्य मदत न मिळाल्याने ३ जणांचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

Snake Bite: वेळीच उपचार मिळाल्याने वाचले ७७ लोकांचे प्राण, ग्रामीण भागात सर्पदंशाचे प्रमाण जास्त
Prakash Ambedkar: "दिवाळी साजरी करण्यासाठी गरिबांना 1 हजार रुपये द्या"; आंबेडकरांची PM मोदींना विनंती

साप - घटना

वायपर- ४२

मण्यार- ०८

नाग -२९

फुरसे- ०१

असा आहे वयोगट

वयोगट घटना

१८ वर्षाखालील ११

१८ ते ६० वर्षे ५९

६०वर्षांपेक्षा जास्त  १०(Latest Marathi News)

Snake Bite: वेळीच उपचार मिळाल्याने वाचले ७७ लोकांचे प्राण, ग्रामीण भागात सर्पदंशाचे प्रमाण जास्त
Shivsena Political Crisis: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला! या तारखेला लागणार निकाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com