शीतपेयांच्या बाटल्या, बाण घरामध्ये सज्ज ठेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakshi Maharaj statement Controversy

शीतपेयांच्या बाटल्या, बाण घरामध्ये सज्ज ठेवा

लखनौ : जमावाने तुमच्या घरावर हल्ला केल्यास पोलिस तुम्हाला वाचविणार नाहीत. त्यामुळे घरात शीतपेयांच्या बाटल्या, बाणांचा साठा करून ठेवा, असे वक्तव्य भाजपचे उन्नाव येथील खासदार साक्षी महाराज यांनी केले. त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून हे वक्तव्य केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, तुमच्या घरावर, बाजूच्या रस्त्यावर किंवा शेजारच्या परिसरात जमावाने अचानक आक्रमण केले तर तशा पाहुण्यांसाठी एक उपाय आहे. त्यांच्यासाठी तुम्ही बाण, बाटल्या सज्ज ठेवा. लोकांनी स्वतःच तयारीत राहावे. तशा परिस्थितीत पोलिस तुम्हाला वाचवायला येणार नाहीत.