

Impersonation Racket: Pune Conman Booked for Posing as Senior Forest Department Official
sakal
नागपूर : स्वतःला वनविभागातील उच्चपदस्थ अधिकारी व टेंडर हेड असल्याचे भासवून टेंडर मिळवून देणे आणि नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत पुण्यातील ठकबाजाने १९ जणांची ९२ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी ठकबाजाविरोधात फसवणुकीसह विविध कलमांसह गुन्हा दाखल केला.