SSC Paper Leak: सेलूत फुटला दहावीचा हिंदीचा पेपर, पेपरफुटीमुळे पालकांची गर्दी; पथक फिरकलेच नाही

दहावीचा शनिवारी हिंदीचा पेपर होता. पेपर सुरू होताच पाच ते दहा मिनिटाच्या अवधीतच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही घटना शनिवारी (ता. नऊ) सेलू येथील यशवंत विद्यालय या परीक्षा केंद्रावर घडली.
Nagpur Paper Leak
Nagpur Paper Leak Esakal

SSC Paper Leak in Selu Wardha : दहावीचा शनिवारी हिंदीचा पेपर होता. पेपर सुरू होताच पाच ते दहा मिनिटाच्या अवधीतच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही घटना शनिवारी (ता. नऊ) सेलू येथील यशवंत विद्यालय या परीक्षा केंद्रावर घडली. या पेपर फुटीमुळे परिसरात चांगलीच गर्दी झाली होती.

सदर पेपर सेलू येथील एका केंद्रातून बाहेर आला असल्याचे बोलले जात आहे. परंतु, त्या केंद्रावरील मुख्याध्यापक केंद्रप्रमुख अविनाश देशमुख सह इतर शिक्षकांनी याबाबत नकार देत हा पेपर आमच्या केंद्रावरील नसल्याचे म्हटले आहे. या प्रकाराची सत्यता जाणून घेण्याकरिता पोलिस उपअधीक्षक मकेश्वर, सेलू तहसीलदार स्वप्नील सोनोने व सेलूचे ठाणेदार तिरुपती राणे यांनी परीक्षा केंद्र गाठले.

पेपर फुटीची घटना वाऱ्यासारखी पसरली असताना शिक्षण विभागाचे एकही पथक येथे फिरकलेच नाही. आजचा हिंदीचा पेपर हा सेलू येथील एका केंद्रावर फुटला व सोशल मीडियावर व्हायरल झाला याबाबत पोलिस शोध घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी सत्य सामोर आणावे, अन्यथा परिसरातील अनेक विद्यार्थ्यांच्या भविष्याचे नुकसान होण्याची शक्यता पालकवर्गांनी केली आहे.

कॉपीमुक्त अभियानाचे तीन-तेरा

राज्यात होत असलेल्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न सुरू आहे. त्याकरिता जिल्ह्यात जनजागृती करण्यात आली. असे असताना जिल्ह्यात पेपरफुटीचा प्रकार घडल्याने अनेकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

Nagpur Paper Leak
IND vs ENG 5th Test : जास्तच उड्या मारतोय... विराटचा वारसा सर्फराजने चालवला; गिलसाठी बेअरस्टोला भिडला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com