esakal | राज्याने केले निवृत्त ; केंद्राने पुन्हा सेवेत बोलावले!
sakal

बोलून बातमी शोधा

govt. office

राज्याने केले निवृत्त ; केंद्राने पुन्हा सेवेत बोलावले!

sakal_logo
By
नीलेश डोये -सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्य सरकारने निवृत्त केलेल्या एका अधिकाऱ्याला केंद्र सरकारने पुन्हा सेवेत बोलावले. विशेष म्हणजे संबंधित अधिकाऱ्याने काही काळ निवृत्तीचा लाभ घेतला. अचानकच पूर्वी केंद्र सरकारकडे पाठविलेल्या अर्जानुसार त्यांना भारतीय सेवेत घेण्यात आले. त्यामुळेच राज्य शासनातील निवृत्त होण्याच्या कालमर्यादेचा फायदा त्यांना मिळाला.

हा प्रकार महसूल विभागातील एका अधिकाऱ्यासोबत झाला. गेल्या दोन,तीन दशकातील ही एकमेव घटना असल्याचे सांगण्यात येते. महसूल विभागातील हे अधिकारी नागपूर विभागातच कार्यरत होते. तीन वर्षापूर्वी नागपूर विभागातील १० अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची सनदी अधिकारी पदावर पदोन्नती देण्यासाठी सूची तयार तयार करण्यात आली होती. यात संबंधित अधिकाऱ्यांचाही समावेश होता.

हेही वाचा: बुलडाणा : बापाचा खून करणाऱ्या मुलीस न्यायालयीन कोठडी

ही यादी यूपीएससीच्या मंडळाकडे पाठविण्यात आली. दरम्यानच्या काळात काहींना सनदी अधिकारी करण्यात आले. परंतु संबंधित अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली नाही. महाराष्ट्रात वर्ग १,२ व ३ मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवृत्त वय ५८ वर्ष आहे. संबंधित अधिकाऱ्यांना ५८ वर्ष पूर्ण झाल्याने निवृत्त करण्यात आले. जवळपास वर्षभराने त्यांना सनदी अधिकारी पदी पदोन्नती मंजूर करण्यात आली. केंद्रात निवृत्ती वय ६० असल्याने त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. आता त्यांना राज्यात एका ठिकाणी नियुक्तीही देण्यात आली आहे. राज्य आणि केंद्रातील निवृत्ती वयातील तफावतीचा फायदा त्यांना मिळाला.

loading image
go to top