
नागपूर : बीसीए, बीबीएला वाढली ‘डिमांड’
नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे पदवी प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा जवळपास संपला आहे. मात्र, या पहिल्या टप्प्यातच नामवंत महाविद्यालयातील प्रवेश फुल्ल झाले. मात्र, एकवेळ मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या बीसीए, बीबीए आणि बीसीसीए या अभ्यासक्रमांना अचानक डिमांड वाढली असल्याचे चित्र दिसून येते.
विद्यापीठामध्ये एकेकाळी बृहत आराखड्यानुसार एकाचवेळी मोठ्या संख्येने महाविद्यालये देण्यात आली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात बीसीए, बीबीए, बीबीसीए यासारख्या अभ्यासक्रम असलेल्या महाविद्यालयांचा मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आला. मात्र, काही वर्षांत त्याची क्रेझ संपल्याने यामधील अनेक महाविद्यालये बंद करावी लागली. मात्र, आता पुन्हा विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांमध्ये या तिन्ही अभ्यासक्रमांसह आयटी अभ्यासक्रमाची क्रेझ वाढली आहे. त्यातूनच यावर्षी प्रवेशाच्या दहा दिवसातच या तिन्ही शाखांचे प्रवेश फुल्ल झाले.
विशेष म्हणजे शिवाजी विज्ञान महाविद्यालय, डॉ. आंबेडकर महाविद्यालयात एकही जागा शिल्लक नसून मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा यादी लावण्यात आली असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे अनेक महाविद्यालयात केवळ मोजकेच प्रवेश शिल्लक आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मनपसंत महाविद्यालय मिळविसाठी चढाओढ सुरू असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे बीएसस्सीमध्येही या अभ्यासक्रमांच्या प्रवेशामुळे काहीसा प्रभाव पडला असल्याचे दिसून येते.
...तर वाढीव जागांसाठी प्रस्ताव
विद्यापीठाच्या पदवी प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यात बऱ्याच नामवंत महाविद्यालयांमध्ये बीएसस्सी, बीबीए, बीसीसीए आणि बीसीए या अभ्यासक्रमाच्या जागा फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता, त्याबाबत महाविद्यालयांकडून वाढीव जागांचे प्रस्तावही देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
बीबीए २५ हजार
बीसीए १६ हजार
बीबीसीए १५ हजार
बीएसई आयटी... १ हजार ७००
Web Title: Nagpur Students Demand For Bca Bba Admission Education Department
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..