महागाव - मेव्हण्याने मारहाण केल्यानंतर उद्विग्न झालेल्या जावयाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना आनंदनगर येथे गुरुवारी (ता. १७) रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. गणेश सेवा पवार (वय ५५) असे मृताचे नाव आहे.
संशयास्पद अवस्थेत लटकलेला मृतदेह व घरात सांडलेले रक्त यावरून आपल्या पित्याची आत्महत्या नसून हत्याच केल्याचा आरोप मृताच्या मुलासह नातेवाइकांनी केला. गावकऱ्यांनी आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवू न दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
गणेश पवार यांचा आपल्या पत्नीसोबत वाद झाला होता. अशातच १२ऑगस्ट रोजी मेव्हणा राजू राठोड (रा.भांब) याने आनंदनगर येथे गणेश पवार यांच्या घरी घरी बेदम मारहाण केली. तसेच घरातील साहित्याची तोडफोड करून नुकसान केले.
त्यामुळे गणेश पवार यांनी राजू राठोड याच्या विरोधात महागाव पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी ती तक्रार दाखल करून घेतली होती. मेव्हण्याने केलेल्या मारहाणीमुळे उद्विग्न झालेल्या गणेशचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.