नागपूर: पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून ३४ वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी वाडी पोलिसांनी पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे..मनीष देवानंद देशभ्रतार (रा. रघुपतीनगर, वाडी) असे मृताचे, तर पूजा देशभ्रतार असे आरोपी पत्नीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनीष यांचा १२ वर्षांपूर्वी पूजासोबत प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत..मागील काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये सतत खटके उडत होते. पूजा अनेकांशी फोनवर बोलत असल्याच्या कारणावरून दोघांमध्ये भांडणे व्हायची. १४ मार्चला पूजा ही प्रणय नावाच्या युवकासोबत घर सोडून गेली होती..Nagpur News: विदर्भातही मॉन्सूनचे लवकर आगमन जूनच्या दुसऱ्या आठवड्यात धडकण्याची शक्यता, तज्ज्ञांनी वर्तविला अंदाज.मनीष यांनी तिला विजयवाडा येथून परत आणले. त्यानंतर ती माहेरी निघून गेली. मुलांची जबाबदारी घेण्यास तिने नकार दिल्याने मनीष मानसिक तणावात होते. या त्रासाला कंटाळून मनीष यांनी २० एप्रिल रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.