
नागपूर : शहरातील ताजबाग यासिन प्लॉट परिसरातील तीन पक्ष्यांचा बर्ड फ्ल्यूमुळे मृत्यू झाल्यानंतर मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे परिसरात प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आलेत. ताजबाग यासिन प्लॉट परिसरातील मृत पक्ष्यांच्या संपर्कातील ३०५४ पक्ष्यांवर ''कलिंग'' प्रक्रिया राबविण्यात आली. याशिवाय १८० अंडी आणि १००० किलो खाद्य नष्ट करण्यात आले. अशी माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली.