esakal | नागपूर : गोरेवाड्यात आता ‘टॉकिंग ट्री‘
sakal

बोलून बातमी शोधा

tree

नागपूर : गोरेवाड्यात आता ‘टॉकिंग ट्री‘

sakal_logo
By
राजेश रामपूरकर - सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानामध्ये आता टॉकिंग ट्री ॲप आपले स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. वन्यप्राण्यांच्या दर्शनासोबत आता पर्यटकांसाठी नवीन आकर्षण ठरणार आहे. अॅपद्वारे पर्यटकांना गोरेवाडा प्राणी उद्यानातील झाडांविषयी माहिती उपलब्ध होणार आहे. यासाठी झाडावर असलेल्या क्यूआर कोड स्कॅन करून मोबाईल फोनवर सदर झाडाची माहिती सांगितली जाणार आहे

गोरेवाडा उद्यानातील साहेबराव या वाघासोबत बिबट, अस्वल आणि तृणभक्षक प्राणी पर्यटकांचे आकर्षण ठरू लागले होते. याशिवाय येथील नयनरम्य व अल्हाददायक वातावरणातील आठवणीही अनेकजण छायाचित्रात कैद करीत असतात. आता महामंडळाने येथे येणाऱ्या पर्यटकांना वृक्षांची माहिती व्हावी या उद्देशाने पर्यटन सुविधांमध्ये विस्तार केला आहे. वन्यप्राण्याशिवाय सेल्फी पॉईन्ट, टॉकिंग ट्रीचाही आनंद घेता येणार आहे. उद्यानाला भेट दिल्यानंतर येथील आठवण राहावी म्हणून येथे सोव्हिनिअर शॉपही सुरू केले असून येथून आपल्याला आवडणाऱ्या वस्तू खरेदी करता येणार आहे.

हेही वाचा: अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्याचा टेबलच काढला; निफाडमध्ये कारवाई

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानातील सोव्हिनियर शॉपचे उद्घघाटन महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यवस्थापक संचालक एम. श्रीनिवास राव, मुख्य महाव्यवस्थापक (औषधी वनस्पती औषधी) संजीव गौंड, महाव्यवस्थापक ऋशिकेष रंजन उपस्थित होते.

या शॉपमध्ये टी-शर्ट, कॅप, सॉफ्ट टॉय, बांबूच्या विविध वस्तू, विविध हस्तकलेच्या वस्तू विक्रीकरिता उपलब्ध आहे. एन. वासुदेवन यांनी दरम्यान, बोलणारे वृक्ष (टॉकिंग ट्री) अॅपचे सुद्धा उद्घाटन केले. सदर ऑपद्वारे पर्यटकांना गोरेवाडा प्राणी उद्यानातील झाडांविषयी माहिती उपलब्ध होणार आहे, असे विभागीय व्यवस्थापक पी. बी. पंचभाई यांनी सांगितले.

loading image
go to top