Teachers Constituency Election : नाशिकनंतर नागपूरमध्ये राजकीय भूकंप; राष्ट्रवादीकडून अर्ज मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satish itkelwar

Teachers Constituency Election : नाशिकनंतर नागपूरमध्ये राजकीय भूकंप; राष्ट्रवादीकडून अर्ज मागे

Nagpur Teachers Constituency Election : नाशिकनंतर नागपूरमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. नागपूर शिक्षक मतदासंघासाठी राष्ट्रवादीकडून अर्ज माघारी घेण्यात आला आहे.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

राष्ट्रवादीकडून अर्ज मागे नागपूरमधून राष्ट्रवादीच्या सतीश इटकेलवार यांचा अर्ज मागे घेण्यात आला आहे.

नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसकडून सुधाकर अडबालेंचं नाव जवळपास निश्चित करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून अर्ज माघार घेतल्यानंतर ठाकरे गटाही त्यांचा अर्ज मागे घेणार का? याचा सस्पेन्स मात्र अद्याप कायम आहे.

सत्यजीत तांबेंच्या बंडानंतर नाशिक-नागपूर जागेची काँग्रेस, ठाकरे गटात नेमकी काय अदलाबदल होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सतीश इटकेलवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नागपूरचे प्रवक्ते आणि ओबीसी सेलचे प्रमुख आहेत.

सत्यजीत तांबेंची खेळी; भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी कॉंग्रेसला मोठा धक्का दिला आहे. त्यांनी नाशिक शिक्षण मतदारसंघ निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार अर्ज भरला आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असलो तरी मी कॉंग्रेसचाच उमेदवार असल्याचे तांबे यांनी म्हटले आहे.