
नागपूर: मुलांच्या राग केव्हा अनावर होईल याचा काही नेम नाही. शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थी चक्क भेंडीची भाजी आवडत नसल्याने आईशी वाद घालून घरातून निघून गेला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने त्याचा शोध घेत परत आणले.