
नागपूर : विदर्भातील नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात २००० वर्षाच्या तुलनेत २०२४ मध्ये सरासरी १.५ अंश सेल्यिअसने वाढ झाली आहे. सोबतच प्रदूषणही वाढलेले आहे. हा ताप अजून वाढत जाणार असून २०३० पर्यंत राज्यातील तापमानात १.० अंश सेल्सिअसच्यावर तर २०५० पर्यंत १.५ ते २.० अंशांच्या वर वाढेल, असा धक्कादायक निष्कर्ष युनोच्या अहवालातून पुढे आला आहे.