

Unlicensed testosterone drug sale exposed in Nagpur.
esakal
नागपूर : त्रिमूर्तीनगरातील ‘ऑल मेडिसिन्स डॉट कॉम’ या औषध विक्री पेढीत परवानगीशिवाय टेस्टोस्टेरॉनसह अन्य स्टेरॉइडयुक्त औषधांची साठवणूक, रिपॅकिंग आणि विक्री केल्याचा प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत समोर आला होता. तपासणीदरम्यान १६ लाख ६५ हजार मुद्देमाल जप्त जप्त केला होता. या प्रकरणी शुक्रवारी प्रतापनगर पोलिस ठाण्यात हरवंश रणवीरसिंह व यश सुनिल उईके यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.