esakal | नागपूर: शहराचा रिंगरोड फुलझाडांनी बहरणार
sakal

बोलून बातमी शोधा

nitin gadkari

नागपूर: शहराचा रिंगरोड फुलझाडांनी बहरणार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर: शहरात विणल्या जात असलेले पायाभूत सुविधांचे जाळे आणि विकास यासोबतच पर्यावरण रक्षण आणि हिरवळवाढीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात त्रिस्तरीय वृक्षारोपणाची योजना राबविली जात आहे. ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्याच्या दृष्टीने आणि पर्यावरण स्वच्छ राहण्याच्या दृष्टीने गडकरी यांच्या सूचनेनुसार वृक्षारोपणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहे.

हेही वाचा: संत्राबागांमुळे मनोज जवंजाळ यांना मिळाली जागतिक कीर्ती

शहरातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना आणि रस्ता दुभाजकांवर त्रिस्तरीय पद्धतीने वृक्षारोपण केले जात आहे. पहिल्या स्तरावर दोन फूट उंचीच्या झाडाचे रोपण केले जात आहे. तर दुसऱ्या स्तरावर विविध प्रकारची फुलझाडे लावली जात असून, ज्या ऋतूत ज्या झाडांना फुले येतात अशा झाडांची निवड करून केली जात आहे. तिसऱ्या स्तरावर आठ ते दहा फूट उंचीची झाडे लावण्यात येत असून, ही झाडे रस्त्याच्या शेजारी लावली जात आहेत. विविध प्रकारच्या फळांचा या झाडांमध्ये समावेश आहे. या सर्व झाडांची निवड वनस्पती तज्ज्ञांनी केली आहे.

या झाडांना मोकाट जनावरे खाऊ शकणार नाही, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. नागपूरच्या २७ किमी रिंगरोडवर १९ विविध प्रजातींची झाडे लावली जात आहे. शहराचे शुष्क वातावरण पाहता कमी पाण्यात जगणाऱ्या वृक्षांचे रोपण करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला फळझाडांचे रोपण केले जाणार आहे.

हेही वाचा: Nagpur:कामगार रुग्णालये आजारी

वृक्षारोपणातून लागवड करण्यात येणाऱ्या या झाडांना नाग नदीचे जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी देण्यात येणार आहे. तसेच शहरातील कचरा आणि भांडेवाडी येथील कचरा प्रकल्पातील खत झाडांना देण्यात येईल. तसेच शहरातील १२ तलावांमधून निघणारी सुपीक मातीही या झाडांना पोषण म्हणून देण्यात येईल.

loading image
go to top