esakal | संत्राबागांमुळे मनोज जवंजाळ यांना मिळाली जागतिक कीर्ती
sakal

बोलून बातमी शोधा

संत्राबागांमुळे मनोज जवंजाळ यांना मिळाली जागतिक कीर्ती

संत्राबागांमुळे मनोज जवंजाळ यांना मिळाली जागतिक कीर्ती

sakal_logo
By
सुधीर बुटे

काटोल (जि. नागपूर) : आधुनिक तंत्रज्ञान, नैसर्गिक शेतमाल पेरणीपासून प्रोसेसिंग पॅकिंग ते मार्केटिंग यात योग्य सांगड घालून शेती कमी खर्चात कशी फायदेशीर करता येऊ शकते, हे कृषी जगताला ज्यांनी दाखवून दिले असे कर्तव्यनिष्ठ शासन पुरस्कृत हर्टीकल्चरमधील सर्वच्च प्रतिष्ठेचा उद्यानपंडित पुरस्कर्ते, चार देशात कृषी सेमीनारसाठी देशाचे प्रतिनिधित्व करणारे संत्रा उत्पादक मनोज जानरावजी जवंजाळ यांनी ही किमया संपादित केली.

शेतीनिष्ठ मनोज जवंजाळ काटोल गळपुरा येथील निवासी. शेती पारडसिंगा मार्गावरील फेटरी शिवारात. साडेबत्तीस एकर जागेत त्यांची शेती आहे. विज्ञान शाखेत पदवी घेऊन १९९१ मध्ये टॉयलेट सोप ६ महिने प्रशिक्षण, त्यानंतर अंकुर सीड, युनिक ऍग्रो प्रकल्प रिधोरा असा २०९९ पर्यंत प्रवास चालला. मनात शेतीविषयी आवड, काही करून दाखविण्याची इच्छाशक्ती असल्याने नोकरीला डावलून शेती करण्याचा ठाम निश्चय केला.

हेही वाचा: जिल्हा बँक निवडणुकीत बच्चू कडूसह तीन आमदारांच्या उड्या

१९९९ ला तयार संत्रा बागांवर लक्ष्य केंद्रित केले. सोबत अंकुर सीडची पाऊण एकर जागेत मिरची लागवड केली. भरघोस तीन लाखांचे उत्पादन झाले. आलेला पैसा संत्राबागेत गुंतवला. शेजारची साडेचार एकर शेती खरेदी केली. तेथे सुद्धा संत्रा बाग लावले. नोकरीपेक्षा शेतीतील वाढते उत्पादन पाहून आवड अधिकाधिक वृद्धिगंत होत गेली. परिसर व दूरवरचे शेतकरी बागा बघण्यास येऊ लागले.

संत्र्याची विदेशात मागणी

विषमुक्त आर्गनिक संत्रा उत्पादन व बाजार मागणी लक्षात घेता साडे ३२ एकर जागेत संत्रा लागवड करण्याचे ठरविले. शासनाने संत्रा विदेशी निर्यात धोरण अंगीकारल्याने महाऑरेंजच्या माध्यमातून प्रथम श्रीलंका, बांगलादेश येथे अन्य बागायतदारांचा संत्रा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठविल्याने विक्रमी भाव मिळाले. उत्पादन वाढत गेले. इच्छाशक्ती वाढली उत्साह सुद्धा वाढत गेला.

सरकारने केले पुरस्कृत

२००८ ला तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण व राज्यपाल जमीर यांनी प्रतिष्ठेचा उद्यान पंडित पुरस्कार, तर २०१८ ला केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते विदर्भातील उत्कृष्ट संत्रा उत्पादक शेतकरी म्हणून सन्मानित केले. कृषी क्षेत्रात छोटे मोठे अनेक पुरस्कार प्राप्त असून शेतकऱ्यांना स्थानिक, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय कृषी सेमिनार, वेबिनरच्या माध्यमातून देश विदेशातील अनुभवाचा तत्परतेने लाभ देत आहे.

हेही वाचा: पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांसोबत युतीचा विचारही मनात नाही; मात्र...

कृषी आयोजनाच्या विदेश वारीकरिता निवड

मनोज जवंजाळ यांना २००८ ला ‘तेरा मादरे फाउंडेशन’ इटली येथे सेंद्रिय शेती आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी भारताच्या प्रतिनिधी मंडळात निवड झाली होती. महाऑरेंजच्या माध्यमातून शासन संत्रा विदेश निर्यात श्रीलंका येथे मार्केटिंग अभ्यासासाठी निवड, दुबई व त्यानंतर २०१८ मध्ये जैन इरिगेशनच्या माध्यमातून इझराईल येथील संत्राबागा उत्पादन अभ्यासासाठी प्रतिनिधी निवड झाली होती.

loading image
go to top