esakal | Nagpur : 'नीट'चा पेपर सोप्पा
sakal

बोलून बातमी शोधा

neet

Nagpur : 'नीट'चा पेपर सोप्पा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशाची ‘राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा‘ (नीट) रविवारी दुपारी २ ता ५ या दरम्यान शहरातील एकूण ६६ केंद्रात पार पडली. विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत समिश्र प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी पेपर सोपा असल्याचे सांगितले तर काही विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स ‘किलर सबजेक्ट' ठरल्याचे सांगितले. मात्र, एकंदर विद्यार्थ्यांनी पेपरबाबत समाधान व्यक्त केल्याचे दिसून आले. पुढल्या महिन्यात निकालाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोरोना प्रोटोकॉलमुळे रविवारी सकाळी अकरा वाजतापासून प्रवेश देण्यास सुरुवात झाली. मात्र, केंद्रात जाताना व परीक्षा संपल्यावर बाहेर आल्यावर पाऊस आल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. ऑफलाइन परीक्षा झाल्याने केंद्र असलेली महाविद्यालये व शाळा वर्षभरानंतर विद्यार्थ्यांनी गजबल्याचे चित्र आज दिसत होते. सुमार २५ हजार विद्यार्थ्यांना ‘नीट' परीक्षा दिली. कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी यावेळी एनटीएने नागपूर शहरातील परीक्षा केंद्रात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ केली होती.

बायो-केमेस्ट्रीचे प्रश्न सोपे

नीटचा पेपर सोपा असल्याचे मत बहुतांश विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. बायो, केमेस्ट्रीचे प्रश्न सोपे होते, तर फिजीक्सचे प्रश्नही फार कठीण नव्हते असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. काही विद्यार्थ्यांच्या मते बायोलॉजीचे दोन्ही विषय बॉटनी व झूलॉजीचे प्रश्न स्कोर करता येण्यासारखे आहेत. यात ३६० गुण आहेत. सोबतच केमेस्ट्रीचा पेपरही सोपा होता, फिजिक्सही ठिक असल्याने चांगला स्कोर करण्याची संधी होती. काही विद्यार्थ्यांनी फिजिक्समधील प्रश्‍नांमुळे थोडी अडचण झाल्याचे सांगितले. मात्र त्यांनाही बायो व केमेस्ट्रीचा पेपर कठीण वाटला नसल्याचे सांगितले. एकूण ७२० गुणांची परीक्षा घेण्यात आली. त्यात प्रत्येकी १८० गुणांसाठी ४५ प्रश्‍न विचारण्यात आले होते.

हेही वाचा: आयात शुल्कात कपात, खाद्य तेलाचे दर किती घटणार? जाणून घ्या

कटऑफ साठी जोरदार चुरस

पेपर पेन मोडवर झालेल्या या परीक्षेची ‘आन्सर की‘ १५ दिवसांत देण्यात येणार आहे. शिक्षकांच्या मते, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी नीटने सुधारणा केली, मागील वर्षी खूप सोपा पेपर होता. केमेस्ट्री विषयात सुधारणा आहेत तर फीजिक्सचे प्रश्न चांगले होते. दुसरीकडे एनटीए ने अनेक सुधारणा केल्या आहेत. यामुळे कटऑफसाठी चांगलीच स्पर्धा पहायला मिळेल. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना अॅन्सर शीटवर अपिल करण्याची सुविधा मिळणार असून त्यानंतर अंतिम अॅन्सर की जाहीर केली जाणार आहे. यामुळे यासाठी नीटचा निकाल पुढील महिन्यात येण्याची शक्यता आहे.

पालकांचाही दिवस गेला

नागपूर जिल्ह्यासह विभागातील विद्यार्थ्यांना शहरात विविध महाविद्यालयात परीक्षा केंद्र मिळाले होते. तर इतर जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी नागपूर येथे कोचिंग लावले होते त्यामुळे त्यांनी शहरातील परीक्षा केंद्राची निवड केली होती. परीक्षा केंद्रावर नियोजित वेळेपूर्वी ११ वाजतापासून रिपोर्टिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्याने इतर ठिकाणाहून येणारे विद्यार्थी पालकांसोबत पोहचले. यामुळे पालक सायंकाळी ५.३० पर्यंत परीक्षा केंद्रावर होते. त्यांचा पूर्ण दिवस त्यात गेला.

loading image
go to top