Nagpur’s proposed 149-km third ring road will integrate highways, metro connectivity and townships.
esakal
नागपूर, : नागपूरच्या विकासाला नवी दिशा देणारा १४९ किलोमीटर लांबीचा तिसरा रिंगरोड आता केवळ महामार्ग न राहता, अलीबाग-विरारच्या धर्तीवर मल्टिमोडल कॉरिडॉर म्हणून विकसित होणार आहे. रस्ते, मेट्रो, टाऊनशिपसह पायाभूत सुविधांचे एकात्मिक जाळे या मार्गावर उभारण्याचे नियोजन आहे.
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एनएमआरडीए) माध्यमातून १२० मीटर रुंद आणि १४९ किलोमीटर लांबीचा तिसरा रिंगरोड विकसित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील १०७ गावांतून जाणाऱ्या या प्रकल्पासाठी सुमारे तीन हजार हेक्टर जमीन शेतकऱ्यांकडून अधिग्रहित करण्यात येणार आहे. या रिंगरोडमुळे शहरासह सध्या अस्तित्वात असलेल्या दोन्ही रिंगरोडवरील अवजड वाहनांचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे