Nitin Gadkari: नागपूर ते पुणे सहा तासांत पोहोचता येणार; गडकरींकडून नव्या महामार्गाची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari

Nitin Gadkari: नागपूर ते पुणे सहा तासांत पोहोचता येणार; गडकरींकडून नव्या महामार्गाची घोषणा

नागपूर : सध्या नागपूर ते पुणे रस्ता प्रवास हा सुमारे १७ तासांचा आहे. पण हा प्रवासाचा वेळ केवळ सहा तासांपर्यंत कमी करण्याचा संकल्प केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. यासाठी नव्या महामार्गाची घोषणा त्यांनी केली आहे.

त्यानुसार नागपूर ते पुणे केवळ सहा तासांत पोहोचता येणार आहे. नागपूरमध्ये एम्स उद्घाटनं पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं, या सोहळ्यात ते बोलत होते. (Nagpur to Pune will reach in six hours Gadkari announced new highway)

हेही वाचा: PM Modi: मेट्रो प्रवासात तिकीट खरेदी अन् विद्यार्थ्यांशी संवाद; यापूर्वीही मोदींनी असं केलंय, जाणून घ्या कारण?

गडकरी म्हणाले, "पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही औरंगाबादहून पुण्यापर्यंत हायवे बनवत आहोत. लवकरच याच्या कामाला सुरुवात होईल. ज्यामुळं नागपूरहून पुणे केवळ सहा तासात पोहोचता येईल, हा माझा विश्वास आहे."

हेही वाचा: PM मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यात कोणकोणत्या महत्वाच्या प्रकल्पांचं होणार लोकार्पण?

याशिवाय विशेषतः महाराष्ट्रात आम्ही सहा एक्सप्रेसवे बनवत आहोत. यामध्ये सूरत-चेन्नई महामार्गाचा समावेश आहे. यामध्ये साऊथकडे जाण्यासाठी मुंबई-पुण्यातून ट्रॅफिक जातं पण नव्या महामार्गामुळं प्रदुषणापासून या शहरांना मुक्ती मिळणार आहे.

हे ही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

त्याचबरोबर सूरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर-सोलापूर-बंगळुरु-त्रिवेंद्रम-चेन्नई-हैदराबाद असाही एक साऊथमध्ये जाणारा मार्ग असणार आहे. तसेच इंदूर-हैदराबाद, हैदराबाद- रायपूर, नागपूर-विजयवाडा, पुणे-बंगळुरु, पुणे-औरंगाबाद हे ७५,००० कोटी रुपयांचे ग्रीन एक्स्प्रेस हायवे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली तयार होणार आहेत.