Nagpur Traffic Police Must Carry Service Gun During Duty
esakal
नागपूर : शहरातील वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील विविध चौकांमध्ये नाकाबंदी, विशेष तपासणी मोहीम तसेच वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी आता ड्युटीदरम्यान ‘सर्व्हिस गन’ बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश गुरुवारी (ता.१६) वॉकी-टॉकीद्वारे देण्यात आले.