Nagpur : रेल्वे पकडण्याच्या नादात गेला जीव

मंगळवारी सकाळी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर गाडी आली.
 train
trainsakal
Updated on

नागपूर : खाद्यपदार्थ घेण्यासाठी उशीर झाला. तोपर्यंत गाडी स्थानक सोडायला लागली. धावती रेल्वे पकडण्याच्या नादात रेल्वेखाली आल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर आज, मंगळवारी सकाळी घडली. गायत्री पांडे (वय ४५) रा. नालंदा, बिहार असे मृत महिलेचे नाव आहे.

रेल्वे पकडण्याच्या नादात गेला जीव

गायत्री यांचे पती बेंगळुरूला स्टेट बँकेत व्यवस्थापक आहेत. त्यांना दोन मुली आहेत. मुलींसह त्या पतीला भेटण्यासाठी गेल्या होत्या. बेंगळुरू-दाणापूर हमसफर एक्स्प्रेसने परतीच्या प्रवासाला निघाल्या. बी-३ कोचमधून त्या प्रवास करीत होत्या.

मंगळवारी सकाळी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर गाडी आली. गाडी थांबताच प्रवासी उतरले. अनेक प्रवासी खाद्यपदार्थ, नाश्ता, पाण्याची बाटली वगैरे घेऊन बर्थवर बसले. मात्र, प्रवाशांच्या गर्दीत खाद्यपदार्थ घेण्यास गायत्री यांना वेळ लागला.

दरम्यान, गाडी सुरू झाली. खाद्यपदार्थांसह त्या धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करीत होत्या. लोखंडी दांड्याला पकडून त्या गाडीत बसणार तोच त्यांच्या हाताची पकड सैल झाली. त्या थेट फलाट आणि रेल्वेगाडीमधील गॅपमधून खाली घसरत गेल्या. त्या भयभीत झाल्या. श्वासाची गती वाढल्याने काय करावे काही सुचेनासे झाले.

त्यांनी जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. धडधडत्या गाडीचे लोखंडी भाग त्यांच्या डोक्यावर आदळत गेल्याने त्या रक्तबंबाळ झाल्या. प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांनी आरडाओरड केली. काही वेळातच गाडी थांबली. आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांना बाहेर काढले. मात्र, प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिस हवालदार संजय पटले, अमोल हिंगवे आणि रूपाली गुल्हाने यांनी घटनास्थळी पंचनामा करून नोंद केली.

आरडाओरडनंतर दिसला आईचा मृतदेह

स्थानकावर एवढी आरडाओरड कोणासाठी होत आहे, याबद्दल गायत्री यांच्या दोन्ही मुलींना काही कळत नव्हते. मात्र, आई आली नाही. कदाचित दुसऱ्या डब्यात बसली असावी, असा त्यांचा समज होता. गाडी थांबल्यावर गायत्री यांच्या दोन्ही मुली खाली उतरल्या. पाहतात तर त्यांची आई रक्तबंबाळ स्थितीत होती.

दोन्ही मुलींनी एकच हंबरडा फोडला. या घटनेची माहिती गायत्रीच्या पतीला देण्यात आली. विमानाने थेट त्यांनी नागपूर गाठले. शवविच्छेदनानंतर गायत्री यांचे पार्थिव कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.