esakal | Nagpur: वाहन, बांधकाम व्यवसाय जोमात
sakal

बोलून बातमी शोधा

बांधकाम

नागपूर : वाहन, बांधकाम व्यवसाय जोमात

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर : पितृपंधरवडा संपताच नवरात्रीच्या पहिल्या माळेपासूनच बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली. नवरात्री ते दसऱ्याचा मुहूर्त साधत दणदणीत खरेदी केली जात आहे. या दहा दिवसांच्या काळात अंदाजे सात हजार कोटीची उलाढाल होईल अंदाज व्यक्त केला आहे. यात वाहन, सोने, बांधकाम व्यवसाय आघाडीवर होते.

कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे गेले वर्ष भीती आणि संक्रमणांपासून सुरक्षित राहण्याच्या मनस्थितीत सर्व होते. कोरोनाच्या दोन लाटांमध्ये अनेकांनी आपले आप्त गमावले. त्या दुःखातून अद्याप अनेक परिवार सावरलेले नाही. गेल्या दीड वर्षापासून बंद अथवा निर्बंधामुळे अनेकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवली होती. आता तिसऱ्या लाटेची शक्यता धूसर असल्याचा दावाही प्रशासनाकडून केला जात आहे. त्यामुळे बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढली आहे.

हेही वाचा: मोदींनी केला दहा लाख कोटींच्या गतीशक्ती योजनाचा शुभारंभ

दुचाकी, चार चाकी वाहनाच्या विक्रीला चांगले दिवस आले आहेत. मागील वर्षी कोरोनामुळे मागणी अतिशय कमी होती. यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर गाडी मिळावी म्हणून दुचाकी वाहनांची बुकिंग जोमाने सुरू आहे. वाहनाच्या शोरूममध्ये ग्राहकांची वर्दळ आहे. कार खरेदीसाठी सहपरिवार ग्राहक येत होते. असेच चित्र दुचाकीच्या शोरूममध्ये दिसले. दसऱ्यापर्यंत ५०० पेक्षा अधिक आणि दोन ते तीन हजारांपेक्षा अधिक दुचाकींची विक्री होण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. दुचाकी वाहनांचे बुकिंग जोमाने सुरू असल्याचे गांधी समूहाचे अध्यक्ष अशोककुमार गांधी यांनी सांगितले.

नवरात्रोत्सवापासून दसऱ्यापर्यंतच्या दहा दिवसांत ग्राहकांची खरेदीसाठी बाजारात वर्दळ वाढली. त्यामुळे बाजारपेठा फुलून गेलेल्या आहेत. शहरात सर्व व्यापारी क्षेत्र मिळून दिवसभरात सात हजार कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

- दीपेन अग्रवाल, अध्यक्ष, चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री ॲण्ड ट्रेड (कॅमिट)

फ्लॅट स्कीममध्ये खरेदीसाठी ग्राहकांकडून चौकशी वाढली आहे. मात्र, क्रयशक्ती कमी झाल्याने ज्या फ्लॅट स्किमवर ९५ टक्के कर्ज मिळत आहे त्या प्रकल्पाला मागणी वाढली. ७५ टक्के कर्ज मिळत असलेल्या प्रकल्पात खरेदी करणारा ग्राहक कमी आहे. मात्र, या क्षेत्राला आता चांगले दिवस येऊ लागले आहे.

- राजेंद्र आठवले, माजी अध्यक्ष, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया

loading image
go to top