

Nagpur Trolley Bus
sakal
नागपूर : शहराच्या रिंग रोडवर आर्टिक्युलेटेड इलेक्ट्रिक (ट्रॉली) बससेवा सुरू करण्याच्या प्रकल्पाला वेग आला असून केंद्र सरकारकडून मंजुरीच्या उंबरठ्यावर असलेला १४८ कोटींच्या प्रस्तावाचा डीपीआर महापालिकेने तयार केला आहे. आता केवळ दिल्लीतील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होणार असून या प्रकल्पास हिरवा कंदील मिळण्याची दाट शक्यता आहे.