
Nagpur Crime Branch Busts Two-Wheeler Theft Gang: 62 Stolen Bikes Seized, 5 Arrested : नागपुरात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. गुन्हेशाखेच्या युनिट पाचच्या पथकाने ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडून २० लाख ४५ हजार रुपये किमतीच्या ६२ दूचाकी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पाच जाणांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान चोरट्यांकडून ऑनलाइन गेमिंग आणि जुगार खेळण्यासाठी वाहनांची चोरी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.