Nagpur : उड्डाणपुलासाठी जागा घेणार नाही ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

इंदोरा-दिघोरी पुलाबाबत गडकरींची ग्वाही
नितीन गडकरी
नितीन गडकरीsakal

नागपूर : कमाल टॉकीज चौक ते दिघोरीपर्यंत तयार होणाऱ्या उड्डाणपुलासाठी कुणाची एक इंचही जागा घेण्यात येणार नाही, अशी ग्वाही देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या उड्डाणपुलाच्या मार्गावरील व्यापारी व नागरिकांची भीती दूर केली. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पारडी पुलाचे काम संपुष्टात येत असून येत्या दोन महिन्यांत लोकार्पण होईल, असेही त्यांनी नमूद केले.

इंदोरा ते दिघोरीपर्यंतच्या उड्डाणपुलाच्‍या कामाचे भूमिपूजन शनिवारी त्यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित होते.

गडकरी पुढे म्हणाले, कमाल चौक ते दिघोरीपर्यंतच्या उड्डाणपुलाच्या दोन पिलरमध्ये १४० मीटरचे अंतर राहणार आहे. हा पूल तयार करण्यासाठी फायबर स्टीलचा उपयोग करण्यात येणार असल्याने प्रकल्पाची किंमत १६०० कोटीवरून एक हजार कोटीवर आली. याशिवाय मेयो हॉस्पिटल ते सुनील हॉटेलपर्यंतचा चारपदरी रस्ता होणार असून शहीद चौक तोडले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

इतवारी मार्केट कळमना येथे हलविण्यात येणार असून पुढील महिन्यात भूमिपूजन करण्यात येईल. मोमीनपुऱ्यातून थेट कामठी रोडपर्यंत पूल तयार करण्यात येत असून मार्च २०२४ पर्यंत काम पूर्ण होईल. इतवारीत ऑटोमेटिक पार्किंग तयार करून त्यावर रूफ टॉपवर रेस्टॉरेंट तयार करण्यात येईल.

इतवारी, महाल हा भाग उत्तम झाला पाहिजे. नागपूर शहरात माझा, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा जन्म झाला. त्यामुळे शहर चांगले करणे आमचे कर्तव्य आहे. इतवारी, महाल भागाचे चित्र बदलत आहे. नागपूरला जगात सुंदर शहर करायचे असून आतापर्यंत झालेल्या कामाचे श्रेय नागपूरकरांना असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके यांचीही भाषणे झाली.

गडकरी उत्तम आर्किटेक्ट ः फडणवीस

मध्य नागपुरातील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी येथे जुने जीर्ण पोलिस क्वार्टर पाडून नवे बांधण्यात येईल. येथेच पार्किंग प्लाझा तयार करण्यात येईल. केंद्रीय मंत्री गडकरी उत्तम आर्किटेक्ट आहेत.

त्यांना सांगितले तर ते उत्तम डिझाईन तयार करून देतील, असे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. चिटणीस पार्कमध्ये अत्याधुनिक स्टेडियमचे डिझाईनही केंद्रीय मंत्री गडकरी तयार करतील, त्यानुसार करण्यात येईल, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पालकमंत्र्यांच्या कामाबाबत धडे घेत असल्याचेही सांगितले.

नितीन गडकरी
Nagpur : नवरा असावा तर अस्सा...यंत्रणाच लावली कामाला

थेट मुख्यमंत्री झाल्याने मला पालकमंत्र्यांचे काम माहीत नव्हते, असे ते म्हणाले. बावनकुळे यांना विकासकामांच्या फाईल्स फिरविण्याचे ज्ञान अवगत आहे. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे मंत्रालयात फाईल फिरविणे व कामे मंजूर करून ते मार्गी लावण्यबाबत आमचे नुकसान झाले, असे म्हणताच हशा पिकला. फडणवीस यांनी विविध कामांसाठी शहराला १९७० कोटी रुपये दिल्याचे सांगितले.

‘वाय’ आकाराच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण

रामझुला ते एलआयसी चौक आणि संविधान चौकापर्यंत वाय आकाराचा उड्डाण पूल आणि नवीन लोहापूल आरयूबीचे लोकार्पण केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

नितीन गडकरी
Nagpur : ब्लू लिफ बारमध्ये सापडली अल्पवयीन मुले हुक्का पिताना ११ जण ताब्यात

यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., महामेट्रोचे संचालक अनिल कोकाटे उपस्थित होते. हे दोन्ही प्रकल्प महामेट्रोने तयार केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com